Home Entertainment बुडत्या अभिषेकला अॅश-बिग बींचा आधार

बुडत्या अभिषेकला अॅश-बिग बींचा आधार

77
0
SHARE
http://janvaninews.com

बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबीयांसंदर्भातील एका बातमीची सध्या इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन लवकरच गौरांग दोशी यांच्या आगामी सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत.

दिग्दर्शक गौरांग दोशी या तिघांनी घेऊन सिनेमा बनवणार असल्याची माहिती आहे. ‘हॅप्पी अॅनिवर्सरी’ असे दोशी यांच्या आगामी सिनेमाचे नाव असेल. दरम्यान, याबाबत बच्चन कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  यापूर्वी हे तिघं ‘बंटी और बबली’मधील ‘कजरा रे कजरा रे’ गाण्यात एकत्र दिसले होते. हे गाणं जबरदस्त हिट ठरले होते.

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या चाहत्यांसाठीही एक खूशखबर आहे. अॅश-अभिची जोडी तब्बल सात वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ‘गुरू’ सिनेमामधील या दोघांच्या अप्रतिम केमिस्ट्रीने तर सिनेरसिकांना वेड लावले होते. यानंतर 2010मध्ये आलेल्या ‘रावण’ सिनेमात हे दोघं शेवटचे एकत्र दिसले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अभि-अॅश ‘गुलाब जामून’ या सिनेमात दिसणार आहेत. अनुराग कश्यप या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नवख्या व्यक्तीला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दोघांनीही या सिनेमाची ऑफर स्वीकारली तर त्यांच्या चाहत्यांसाठी  ही खूशखबर असेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here